10/20/21

प्रेम रंगात

       💝प्रेम रंगात💝

दर्पनात मी माझीच हसून पाहते
माझे मन आता सैरावैरा धावते.

माझीच मीच नाही उरले 
मनात कोणी घर करु लागले.

एकांतात त्याच्या आठवणीत
एकटीच हसू लागले.

मोर पीसा सोबत खेळत असते.
मी जशी कृष्णाची राधाच झाले.

राधे सारखे मी त्याची वाट पाहते
मनाच्या प्रेम वृंदावनात मी एकटीच राहते.

काय होते असे मलाच मला कळेना
आज माझीच सावली मलाच दिसेना.

प्रेम रंगात रंगून मी वेळी 
सख्या मी तुझीच वाट पाहते.

🍂🍃🍂🍃🍂🍃🍂प्रेम रंगात🍂🍃🍂🍃🍂🍃
                               शब्द कवी देवेंद्र...✍️

9 comments:

  1. व्वा..अतिशय सुंदर रचना 👌👌👌👌👌

    ReplyDelete
  2. खूप सुंदर...प्रेमाच्या रंगात जणू राधाच रंगते... आपल्या श्रीकृष्णाची आतुरतेने वाट बघते.सुंदर रचना...👌👍✍️🍫🍫🍫🍫🍫

    ReplyDelete
  3. खूपच सुंदर रचना 👌👌👌

    ReplyDelete
  4. वाह मस्तच राधा कृष्णाचं प्रेम अप्रतिम 👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻

    ReplyDelete
  5. अप्रतिम रचना केली सर 👌👌👌👌

    ReplyDelete
  6. अप्रतिमच 👌👌👌

    ReplyDelete
  7. अप्रतिम 👌👌👌👌🙏🙏

    ReplyDelete
  8. व्वा खूप छान लिहिलंय अप्रतिम रचना

    ReplyDelete

Comments (समीक्षा साठी )
ह्या Blog वर Subscribe Button Click करावे.

सुंदर माझं कोकण....

सुंदर माझं कोकण.... सुंदर तो नजारा सुंदर तो देखावा डोंगराच्या त्यारांगा त्यावर हिरवी रंगावा त्या हिरवा रंगावा तून उडतो असतो ...