🌹अबोल प्रेम कहाणी🌹
आज आयुष्यातला खुपच वेगळा दिवस होता.खुप वर्षीनी ती आज मला भेटली.शाळेच्या दाहावी नंतर काँलेजला सोबत होते.लहान पणाची ओळख जरुर होती, आमची पण शाळेत मैत्री झाली.काँलेज सुरु झाल आणि बघता बघता खुपच आम्ही जवळ आलो.पण सगळ्या गोष्टी आम्ही शेयर करत असायचो,पण एकच गोष्ट आमच्यात अशी हो की आम्ही कधीच बोलो नाहि.कारण दोघाच्या मनात ऐकच भिती होती कि आमची मैत्री तुटुन जाईल म्हणून.आमच बी.ए. झाल.मि पुढील शिक्षण घेन्यास गाव सोडून गेलो.मी वीस वर्षानी पुन्हा गावी आलो.पण गावी येन्या आधीच मला प्रोफेसर ची नोकरी मिळाली होती,गावा जवळच बदली झाल्या मुळी गावा वरन काँलेजला या जाच ठरवल .आज गावी तर आलो .मी पण संध्याकाळच्या वेळेला बाहेर बसलोल अस्ताना.सगळ्या गावाचे वातावरन वेगळेच झालेल दिसत होत.हळूवार पण ती च्या घरा कडे नजर गेली बघतो तर काय सगळी घर आता पुर्वी सारखी नव्ही पण अजुनही तीच घर जस च्या तसच होत.हळू वार संध्याकाळचा सुर्य पण आज वेगळाच दिसु लागला होता.तो हि तांबूस रंगाचा झालेला दिसु लागला.गार असा वारा सुरु झाला होता. आणि मला आज पण तीच्या आठवणी येऊ लागल्या होत्या.तीच्या आठवणी अस्ताना ह्दयाचे ठोके अचानक वाढू लागले होते.मला अचानक तीच्या घरातन आवाज आला.मी बघन्यास मान वर केली तर बघतो तर काय आज तीला मी विस वर्षानी बघीतल होत.ती ची माझी नजर एक झाली.आमच्या दोघांच्या गालावर हसु दिसुला गल होत.ती आज हि दिसायला तशीच दिसत होती .सुंदर निरागस, आता तीचे थोडे केस पांढरी झाली होती.मि तीला आणि ती मला एक टक बघत होतो.मी हळूवार उठून पावल तीच्या कडे जाऊ लागले.ती हि हळूवार माझ्या कडे येत होती ,आज आमची पुन्हा भेट झाली.ती ने पहिला शब्द काढला कसा आहेस. मी छान आहे.मी हि तीला तेच वीचारल,ती हि छान आहे बोली.तीला वीचारल तुझ लग्न जमलेल्याच मला कळाल. मग तु इथ कशी ,वीचारताच ती ची मान खाली.गेली तीच्या डोळ्यात पाणी आलेल दिसु लागल.मी पुन्हा वीचारल काय झाल.तर ती डोळे पुसत बोली नाही झाल.मी विचार तुझ तर लग्न जमल होत न मग का नाही केलस .त्या वर ती पुढे बोलु लागली हो जमल तर होत ,पण माझ्या लग्नाच्या दिवशी लग्नाला येनार्या वराडीचा अँक्सीडंत झाला.त्यात नववरदेव म्हणजे माझा होनारा नवरा देखील मृत्यू झाला.लोक मला नाही नाही ते बोलु लागलेत. मग मी लग्न नाही कराच ठरवल. आज मि आपल्याच गावातील प्राथमीक शाळेत शिकवते.बर ते जाऊ दे तुझ लग्न झाल कि नाही.येवढ विचारता होताच मि मान खाली घातली आणि बोलो नाही.ती ने पुन्हा वीचारल का नाही केलस,तर तीला बोलो मला हवी तशी कोनीच नाही मिळाली.तेवढ्यात अचानक पाऊस सुरु झाला.आम्ही दोघे पळत पळत माझ्या घरात आलो. मी तीला बोलो खुप दिवसांनी आपण भेटलो आहोत तर चहा घेऊयात आणि पाऊस हि सुरुच आहे.ती हो बोलताच मि किचन मध्ये जाऊन चहा ठेवला.बाघेर येत अस्ताना ती माझला मिळालेले बक्षीस,पारी तोशीक ,प्रमाणपत्र बघत होती.आणि तीची अचानक नजर एका डायरीवर गेली.ती डायरी म्हणजे तीने मला काँलेजला अस्तानाची दिलेली होती.ती अजुन मी सांभाळून ठेवलेली ,ती मला आवाज देऊन बोली अजुन पण हि डायरी तु सांभाळून ठेवली आहेस.मी चहा घेऊन आलो आणि बोलो हो.ती ने ती उघडून बघीतली त्या वर तीच नाव लीहिलेल होत.ती ने मला वीचारल तर आज मी हि न घाबरता तीला सगळ सांगन्यास सुरुवात केली ,मी तुझ्यावर काँलेजला अस्ताना पासुन प्रेम केलय आणि करत आहे.म्हणून मी अजुन लग्न नाही केल.तीचे डोळ्यात पाणी आले पण ते आज अश्रु नव्होते तर त्यात प्रेम दिसु येत होत.ती जवळ येऊन ह्दयावर डोक ठेऊन बोलू लागली माझ हि तुझ्यावर काँलेजला अस्थाना पासुनच प्रेम आहे.मी काहि बोलन्या आधीच बोली ती तु माझ्याशी लग्न करशील.मी तीला मिठीत घेऊन हो कार दिला.
कशी वाटली अबोल एक प्रेम कथा....
देवेंद्र.... प्रेम कवी...✍️
Apratim da ❤❤
ReplyDeleteखुपच छान लिहीलयस 👌👌👌👌
ReplyDeleteअप्रतिम खुप सुंदर कथा
ReplyDeleteअप्रतिम फार छान कथा लिहिली आहे
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteवाहहह... ह्रदयस्पर्शी कथा...👌👍💐🍫
ReplyDeleteअप्रतिम कथा लिहली
ReplyDeleteअतिशय सुंदर प्रेम कहाणी👌👌👌
ReplyDelete