1/17/23

सुंदर माझं कोकण....

सुंदर माझं कोकण....

सुंदर तो नजारा
सुंदर तो देखावा
डोंगराच्या त्यारांगा
त्यावर हिरवी रंगावा

त्या हिरवा रंगावा तून
उडतो असतो पक्षांचा थवा
कोवळी कोवळी किरणात
दिसतो गुलाबी रंग तो गारवा

गुलाबी रंगाच्या गारव्यात
वाहत असतो सागरी लाटा
शांत त्या लाटा वाहताना
दिसतो नावेचा थाटा

माझ्या कोकणाच घर
कौलारूणे सजलेले दिसत
घराच्या समोर नाळ वृक्ष असत
मनमोहन हा नजरा बघ सुंदर दिसत

माझ्या कोकणात खाण्याचा
आनंद काही तरी वेगळा असतो
साधीसुधी असतात आमची माणस
कोणालाही लळा लवकर लावतो.

अस असत माझे कोकणात
निसर्गाच्या सानिध्यात दिसत
सुंदर माझं कोकण बघायला
लोक इथे भेटीला येत असत.
देवेंद्र...✍️



11/14/22

"संयम"

"संयम"

मानवी जीवनाती सगळ्या महत्त्वाचा भाग म्हणजे.
"संयम" होय.रागावर, बोलण्यावर,आणि तसेच मानवी देहाती इंद्रियांन वर ज्यांनी संयम मिळवला त्यांनी आपल्या जीवनात विजय सहज मीळवत असतात.
देवेंद्र...(शब्द कवी)✍️



4/10/22

सत्य वचन

सत्य वचन


रावने ब्रम्हादेवा जवळ वचन मागीतले
तेव्हा ब्रम्हादेवाने सांगितले जो जल्म घेतो
तो एक दिवशी जावे लागते.
तेव्हा रावन बोला हो हे सत्य आहे
मी अमर नाही होऊ शकत
मला अस वचन द्या की माझे आदिदेव
महादेव यांच्या भक्तांच्या हातून माझ मरन व्हाव
असा भक्त जो माझ्या इतकाच महादेवाला प्रिय असावा.
ब्रम्ह देवाने तथास्तु म्हणून अशिर्वाद दिला व अदृश्य झाले.

रामाचे व रावनाचे युद्धात जेव्हा रावन मृतदेह पडला तेव्हा
लक्ष्मणाने रावनाच्या पाया जवळ बसून जे रावनाचे शब्द ऐंकले ते शेवटचे राम राम राम होते.
ब्रम्हदेवाने दिले वचन रावनाला आठवले होते.सत्य वचन हेच आहे.मर्यादा पुरुषोत्तम श्री राम आहे. सगळ्या गोष्टीच्या मर्यादा
पाळनारे राम आहेत.
रावनाने रामाची माफी मागीतली व रावन गत प्राण झाला.

वरील रचना ही एक काल्पनिक रचना केलेली आहे.
शब्द कवी...✍️


1/31/22

काळ ,वेळ,वर्ष व माणस...


Google free image

काळ ,वेळ,वर्ष व माणस...
काळ बदलतो तशी वेळ बदलते 
वर्षी बदलतात तशी माणूस बदलतो 
जीवनात आनंद नेहमी तसाच असतो 
फक्त दुख एकच बदलेल्या काळात वेळेल,
व वर्षात ही माणस बदलतात त्याचे आहे .
पण असो माणस आयुष्यात वेळे नुसार
येतात व जात रहातात. जी आपल्या जवळ
असतात वेळे सारखी थांबून असतान ती
माणस खरी आपलीसी असतात.
हे माझ ते तुझ व स्वार्थी असतात तीच माणस 
सोडून जातात.
जीवनात जर आनंद व प्रगती माणसाची होतेना ती
जी आपल्या सोबत आहेत माणस त्यांच्या मुळेच होते.
वेळ आपल्या बरोबर जेव्हा नाही तेव्हा सोडून गेलेली माणस
सुध्दा आपलीशी नसतातच. 
सोडून जानाऱ्या माणसान मध्ये जी नेहमी आठवणीत
असतात ती माणस फक्त आपल्या ह्दयात असतात.
बरोबर न नक्की कमेंट मध्ये  सांगा.
 शब्द कवी देवेंद्र...✍️ 

1/14/22

अलग कथा...2

एक चूक...

"अरें ,कॉफी झाली ,कॉफी सोबत नाष्टा देखील झाला."

"हों ग ,खुप बोललो देखील . चल, बराच वेळ झाला आता निघूयात."

"चल ,ओके बाय ,अरें पुन्हा आपण लवकर भेटू"

"हो नक्कीच..."

मी घरी आले आमच्या दोघांच्या भेटीने खुप आनंद झाला होता.
पण नाष्टा करतानाचा तो क्षण आठवून मला शहारा उठला.
........
"कॉफी वरच खुश ठेवणार  आहेस ,की नाष्टा देखील करवणार आहेस.?"

"हो ,मग तू ऑर्डर दे , तुला जे आवडेल ते."

"बर देते..."

नाष्टा करतांना मी विचारले " अरे ,तूझ्या त्या कार्यक्रमाच काय झाल.?"

"तू त्या बदल  विचारु सुध्दा नकोस."

"का ? काय झाले असें? तू तर फार मोठ्या लोकांना बोलावल होतस ना ? मग?"

"कशाचे काय मोठे ? " जेव्हा  सगळे कार्यक्रम नियोजन झाले.ओळख असलेली काही कलाकार मंडळी आली.

"अग ,कार्यक्रम तर खूप छान  झाला, पण काही लोक नको नको त्या दृष्टिकोनातून बघतात ,तेव्हा कळत
कोण कस आहे." 
पण यात कोणाला काही कळाल,कोणाला कळालच नाही. पण ज्यांना कळाल त्या सगळ्याच्या नजरेत माझी इज्जत गेली.
माझ्या बदल कोणाला काय वाटतय याच विचारात राहून राहून मी अक्षरशः बेशुद्ध झालो. जेव्हा डोळे उघडले तेव्हा बघीतल मी एका हॉस्पिटल मध्ये होतो व ज्या सगळ्याचा मी विचार करत होतो ,ती सगळी माणस माझ्या आजूबाजूला उभी होती , मला धीर देत होते.

त्याच्यातील  एक दिग्गज कलावंत बोलले," जे झाल त्याचा विचार करू नकोस व यात तुझी काही चूक नाही.आम्ही आहोत तुझ्या सोबत. तू लवकर बरा हो ,तू गेल्या तीन दिवस झाले बेशुद्ध होतास."

हे ऐकून मी आश्चर्याने  त्यांच्या कडे बघीतल. मला आठ दहा दिवस  लागले  बर व्हायला . योगायोगने माझी बदली हैदराबादला झाली. आणि आज तुझ्या समोर आहे.
"वाह   ! खूप छान, इतक काही घडल व तू आज सांगतोयेस."

"अग ,तू  आता भेटली आहे, अजून खूप काही बोलायचे आहे मला आपण लवकरच भेटू."

इतक्या गोष्टी त्याच्या आठवत बसली तेवढ्यात मोबाईल वाजला.
"अरे तू? "

"का ग ? माझाच विचार करत होतीस की काय..?"

"अरे ,हो ,नाही ,हो"

"हो नाही ,हो नाही ,काय? "

"हो ,तुझाच विचार करत होते, तेवढ्यात तुझा फोन आला. 
शंभर वर्षे आयुष्य आहे तुला."

"हो ,ते तर हवच मला पण तूझी ही साथ हवी....😆😆😆"

उर्वरित पुढील भागात नक्कीच वाचा.
शब्द कवी देवेंद्र....✍️

1/07/22

अलक कथा...

अलक कथा....
विषय :-विचारांचा ठेवा

ती आणी तो सुंदर अशा ठिकाणी कॉफ़ी घेण्यासाठी गेले होते . सहज तिने त्याला विचारल

"अरे  ,सुंदर काय आहे.?

तो म्हणाला ," बघायच झाल ना,  तर सगळं जग सुंदर आहे, पण बघण्याचा दृष्टिकोन असायला हवा."

"दृष्टिकोन ? कसा रे ?

"अग , दृष्टिकोन दोन प्रकारचे आहेत,पहिला जसी दृष्टी तसी सुष्टी व
दुसरा म्हणजे तु विचारल सुंदर काय?
तर ,माझ्या नुसार  सुष्टी सुंदर आहे पण त्याहून सुंदर असाला हव मन ."

"हो ,तुझे म्हणजे बरोबर आहे.
पण मन कस सुंदर हव.?

" मन हे निरंजनातल्या ज्योती प्रमाणे प्रकाश मान,तेजस्वी, व नेहमी दुसऱ्या ना आनंद देणार . अंधारातुन उजेडात नेणार हव. मन हे ईतक शुद्ध व पवित्र असवा की ईश्वराला देखील हेवा वाटावा अस"

"खर आहे तुझ , विश्वात सगळ्यात सुंदर मन आहे. हे तु खूप छान सांगीतल व मी ही मन सुंदर ठेवेल आज पासून"

" चल मग काँफी घेऊयात या सुंदर गोष्टी बदल."

"हो हो नक्कीच "

दोघी हसत  छान काँफी घेतात.

कशी वाटली अलक कथा नक्कीच सांगा  व पुढील कथां साठी प्रेरणा द्या.

अलक कथा लेखक:-देवेंद्र (शब्द कवी)


11/19/21

मोह

मोह
मोह हा सरता सरेना
कोणीच प्रेमाची वाट सोडेना
आठवणीत प्रेम राहून जाते
पुन्हा पुन्हा प्रेमाची वाट आठवते
मन नको तीथे फिरत राहते
प्रेमाच्या मोहात मन अडकून पडते.
देवेंद्र...✍️

11/16/21

चारोळी

🍃🍃🍃🍃🍃🍃चारोळी🍂🍂🍂🍂🍂🍂🍂

किती तरी दिवसांनी
आज मी काव्य रचले
मनातले माझे सगळे
लिहायचे राहून गेले.
 🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂

हे जळनारे लाकडलची आग आहे.
त्या प्रमाणे प्रेमात मी जळत आहे.
जे शेवटी उरलेली  राख असेल ती
ही माझ्या प्रेमाची निशाणी असेल

🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃

जिवन हे अपुर्ण असते.
मनात कलह होतच असते.
कलह नसेल तर जीवन नसते.
कलह असताना जिवनात साथ कोणाची नसते.

🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂

        चारोळी......✍️शब्द कवी

10/27/21

Love taught me


ओंजळभर

आज तूझे स्मीथ हस्य बघीतले.
माझ्या डोळ्यात ते बघून पाणी आले.
थोडावेळ का होईन तूझ्या नजरेतून
मला ओंजळभर प्रेम खूप वर्षीनी मिळाले.
        🌹  ओंजळभर 🌹
                 शब्द कवी देवेंद्र...✍️

"मन किनारा"

"मन किनारा"
मनातले कोडे माझे सुटता सुटेना
मनातून तूझी ओढ माझी जाईना
मनाला समजावून ही कही करमेना
मन माझे तूझा वाचून आता राहवेना.
🍂🍃🍂🍃🍂🍂🍃🍂🍃🍃🍂🍃🍂🍂🍃🍂🍃
हा सागरी किनारा 
मंद मंद हा वारा
बेधुंद करतो मनाला
प्रेम धुंदीत नेतो हा वारा
कळेल का माझ्या प्रियाला
का लावतो वेड माझ्या मनाला.
 शब्द कवी देवेंद्र...✍️
🍂🍃🍂🍃🍃🍂🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂

10/26/21

"काव्यसखी"

      "काव्यसखी"
शब्दात तूझे कसे वर्णन करावे.
शब्द रुपी काव्यातून मन जिंकले.
शब्द रुपी भावना तू मांडून जातेस.
शब्द चार ओवीत मांडतेस पण
अर्थ पुर्ण रचना तू करतेस.
मनाची दूविधा मांडतेस.
भावनेत वाचकांना नेतेस.
अपुर्णला रचनेतून तू पुर्ण करतेस.
संपूर्ण तूझी इच्छा पुर्णपणे व्हावी.
चारोळीची राणी म्हणून जगभर
तूझी प्रसिद्धी व्हावी.
रंजू ताई तूम्हाला 3000 रचना पुर्ण केल्या बदल खूप खूप अभिनंदन
💐💐💐💐💐💐💐💐💐✍️
✍️✍️✍️💐💐💐💐

                      शब्द कवी देवेंद्र...✍️

💝कविता💝

💝कविता💝
कविता ग कविता ग
तु कशी आहेस ग,


वाचकांच्या मनाला ग
वेड लाऊन तु जातेस ग,


अर्धवट राहिले शब्द असतात ग
पुर्ण अर्थ तु सांगतेस ग,


मला ही तुझे रंग रुप कळत नाही ग
कधी भावनात तर कधी दुखात तु ग,


 कधी चारोळी तुझे रुप आहे ग
मनाला भेद नारी तु प्रेम कविता ग,


एकांतात तुला आठवले तर ग
गालात तु हसऊन तु जातेस ग,


विरह भावनेत तु वाहतेस ग
पण मन तु मात्र जिंकतेस ग,


तुझा प्रवास सगळा वेगळाच ग
जशी तुला बघीतले तशी तु ग,


कविता तु कविता आहेस ग
मन तु माझे भिजवून जातेस ग,


अशी कशी ग तु कविता आहेस ग
जशी साजरी गोजीरी ही कविता ग.
          💝कविता💝
          शब्द कवी देवेंद्र...✍️

माझ्या सगळ्या कविता लेखकांच्या मनातील लपलेली कवितेचे हे वर्णन.
आवडल्या नक्कीच प्रतिसाद द्या.🙏


10/25/21

"क्षण"

      "क्षण"
क्षण आयुष्यात येतात
क्षण आयुष्यातून जातात.
क्षण आयुष्यात सुख देतात.
क्षण दुखात शिकऊन जातात.
क्षण जीवनाला आकार देतात.
क्षण आठवणीत राहून जातात.
क्षण हे क्षण असतात.
क्षण खुपच महत्वाचे ठरतात.
          "क्षण"
  शब्द कवी देवेंद्र...✍️


10/21/21

अर्धवट

💔अर्धवट💔


एकांतात आठवणी 
जाग्या झाल्यात.


पहिल्या प्रेमाच्या आठवणीत
मन गुंतत राहत.


सैरभैर झालेल मन आता
एकट तुझ्या आठवणी फिरत.


मनातल्या सागरता ते
बुडून मरत असत.


मन जेव्हा तुझ्या आठवणीत
शितीजा पलीकडे कडे जात.


तेव्हा तेथे ही तुझाच
चेहरा समोर दिसतो.


अर्धवट या प्रेम कहाणीत
फक्त प्रियकर मरत असतो.

🍂🍂🍂🍂🍂🍂💔अर्धवट💔🍂🍂🍂🍂🍂
                              शब्द कवी देवेंद्र...✍️

10/20/21

💝प्रेम भाव💝

💝प्रेम भाव💝

शब्द शब्द काव्यातूनी
दोन काव्य लेखक भेटले.

शब्द काव्यात दोघांचे
जुगलबंदी सुरु झाले.

जुगलबंदी तून शब्द
रंग उधळू लागले.

उधळलेल्या रंगात
मन ही जळून आले.

जळून आलेले मनात
दोघांच्या प्रेम निर्माण झाले.

नकळत शब्द ही प्रेमात
रंग भरु लागले.

राधाकृष्ण शब्द वेली झाले.
जसे शब्दाचे वृंदावनच झाले.

काव्य जनू गोपीका होऊ लागले
दोन प्रेम भाव कवी शब्दातून एकच झाले.

शब्द कवी ने दोन काव्य
लेखकातले प्रेम भाव रचले.

 🍃🍂🍃🍂🍃 💝प्रेम भाव💝🍃🍂🍃🍂🍃
                         -: शब्द कवी देवेंद्र...✍️:-


प्रेम रंगात

       💝प्रेम रंगात💝

दर्पनात मी माझीच हसून पाहते
माझे मन आता सैरावैरा धावते.

माझीच मीच नाही उरले 
मनात कोणी घर करु लागले.

एकांतात त्याच्या आठवणीत
एकटीच हसू लागले.

मोर पीसा सोबत खेळत असते.
मी जशी कृष्णाची राधाच झाले.

राधे सारखे मी त्याची वाट पाहते
मनाच्या प्रेम वृंदावनात मी एकटीच राहते.

काय होते असे मलाच मला कळेना
आज माझीच सावली मलाच दिसेना.

प्रेम रंगात रंगून मी वेळी 
सख्या मी तुझीच वाट पाहते.

🍂🍃🍂🍃🍂🍃🍂प्रेम रंगात🍂🍃🍂🍃🍂🍃
                               शब्द कवी देवेंद्र...✍️

मन

मन
मन मन माझे शांत झाले.
जीवनसाथीची  साथ नाही.

मीच माझी अधांतरी एकटी ऊभी
मन माझे हे तर वेडे झाले ही नाही.

स्वताची आज सावली देखील बोलु लागली
मन माझे  अथांग सागराची भरती घेऊ लागले

उंच भरारी घेऊन उडून जावे असे मन माझे झाले.
पतंगा सारखी मी शब्द काव्याने आता मनाने उडू लागली

पतंगा प्रमाणे मी आता आकाशात फिर की घेऊ लागली
माझे मन मी ओडखू लागले ,मी माझीच नाही उरले.

या पतंगाला धागा कोनी देऊ लागले
उंच भरारीच्या आनंदात वाट कोणी तरी दाखवले

माझ्या आनंदात तो ही आनंल गवसू लागला
मी पतंग झाले तो वारा होऊन मला उंच उडऊ लागला

 मनाने मनाचे ऐंकले मी आता माझीच नाही उरले               उरल्या त्या आठवणी,जीवनाचे सुर मी गवसले.

🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃 मन 🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃

                                शब्द कवी देवेंद्र....✍️


10/19/21

🔘कोजागिरी🔘

🔘कोजागिरी🔘
मंद मंद प्रकाश हा
चंद्रांचा पडला,
मधुर स्वरात ह्या
दुधावर चंद्राचा
 प्रकाश पडला,
सुगंधी केसराचा
रंग दुधावर चढला,
मध्य रात्रीला गार
गार वारा हा पसरला,
दुधावर चंद्राचा प्रकाश 
प्रखर पडु लागाला,
कोजागिरी सन हा
आज साजरा होऊ लागला.
🍃🍃🍃🔘कोजागिरी🔘🍃🍃🍃
               शब्द कवी देवेंद्र...✍️
या शरदचंद्र कोजागिरीच्या तुम्हाला व तुमच्या परीवाराला
या शब्द कवी कडून हार्दिक शुभेच्छा💐💐💐

10/18/21

हालें दिल...

डर डर कें तुम युही रहते हो

हमारा हाल दुसरो को पुछते हो

मोहोबत हम सें बोहोत करते हो

मगर कहनें को बोहोत युही डर तें हो,

🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂

डर तें तो हम नही है

हम आप सें मोहोबत करते है

हम अभी मोहोबत में आधे अधुरे है 

आप कें पुरे होने के बाद हम हमारें ही नही रहेंगे

इस लीयें मोहोबत का हम इजहार नही करते हैं

🍂☘️🍂☘️🍂☘️💝हालें दिल💝🍂☘️🍂☘️🍂
                                   शब्द कवी...✍️




सुंदर माझं कोकण....

सुंदर माझं कोकण.... सुंदर तो नजारा सुंदर तो देखावा डोंगराच्या त्यारांगा त्यावर हिरवी रंगावा त्या हिरवा रंगावा तून उडतो असतो ...